बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि 15 ते 20 अनोळखी व्यक्तींविरुद्ध दक्षिणेतील बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी रात्री एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी पहाटे पोलीस ठाण्यात आदित्य ठाकरे आणि सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एन एम जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्याने काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. विविध कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे लोअर परळ आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला होता.
पुलावरील दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण झाले असून पथदिवे, मार्ग डिझाइन, रंगरंगोटी आदी कामे पूर्ण करून तीन-चार दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिकेचा मानस आहे. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी पुलाच्या दक्षिणवाहिनीवरील पूलाचे उद्घाटन केले.
पण या पूलाची चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे यावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने महापालिकेचे दुय्यम अभियंता पुरुषोत्तम इंगळे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि 15 ते 20 अनोळखी व्यक्तींविरुद्ध एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शनिवारी पहाटे ३.२२ च्या सुमारास आदित्य ठाकरे यांच्यासह सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला.