Advertisement

मनसेने वात पेटवली, त्याचा भडका होऊ शकतो; मुंबईच्या डबेवाल्यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबईतील डबेवाल्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.

मनसेने वात पेटवली, त्याचा भडका होऊ शकतो; मुंबईच्या डबेवाल्यांचा राज्य सरकारला इशारा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आल्यानं लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. लॉकडाऊनमुळं जून महिन्यात लोकल सुरु करण्यात आली परंतु केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली. त्यामुळं सर्वसामान्यांना प्रवासासाठी परवानगी नाही. त्यामुळं लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं.

मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 'मनसेने आंदोलन केलं. त्यामुळं सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल', असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी दिला आहे.

मुंबईतील डबेवाल्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतील, असे सांगण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा