Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीही शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकी मिळाली होती.

मराठीत लिहिलेले पत्र महापौरांना मिळाले असून त्यात अपशब्द वापरण्यात आले आहेत. तिने ‘दादा’शी पंगा घेतल्यास त्याचे परिणाम होतील, असा इशारा पत्रात दिला आहे.

मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी महापौरांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे.

गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.  महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा