Advertisement

पाणी साचल्याने मुंबईकर त्रस्त, मुख्यमंत्री म्हणतात “अरे बाबा स्वागत करा तक्रार काय…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावर सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे.

पाणी साचल्याने मुंबईकर त्रस्त, मुख्यमंत्री म्हणतात “अरे बाबा स्वागत करा तक्रार काय…”
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. यावर्षी देखील मुंबईत अशीच परिस्थिती निर्माण झाली. शनिवारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. यात मुंबईकरांचे हाल झाले. 

पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावर सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मुंबईत पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. पाऊस झाला याचं स्वागत करा, असं म्हणत त्यांनी पाणी साचलं ही तक्रार का करता असं म्हटलं.

“आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा