मुंबईतील मतदान परिवर्तनाच्या बाजूने - आशिष शेलार

 Mumbai
मुंबईतील मतदान परिवर्तनाच्या बाजूने - आशिष शेलार

दादर - मुंबईत आज मतदान झाले आहे ते परिवर्तनासाठी झाले आहे. मुंबईत मतदानाची टक्केवारी 54 % जवळपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाच्या हाकेला साथ देऊन मुंबईकरांना परिवर्तन आणि बदल हवाय असं वक्तव्य भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलंय. मंगळवारी दादरच्या वसंतस्मृती या भाजपाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच भाजपाने जागेबाबत दावा केला होता त्या अनुरूपच मतदान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या कोणत्याही नेत्याने निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केलेला नाही असा दावाही आशिष शेलार यांनी या वेळी केला.

Loading Comments