Advertisement

महापालिका निवडणूक ऑक्टोबर महिन्यात?

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या एका वक्तव्यामुळे आता महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

महापालिका निवडणूक ऑक्टोबर महिन्यात?
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच वर्षी होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या एका वक्तव्यामुळे आता महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाजपच्याच एका कार्यक्रमात महापालिका निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल, असे सूतोवाच गुरुवारी केले. त्यानुसार त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले.

भाजपने विलेपार्ले येथे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी शेलार यांनी हे सूतोवाच केले. ‘येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागली तर आपल्याकडे फक्त १२० दिवस उरतात.

गेल्या निवडणुकीत आपण ८२ जागांवर थांबलो होतो. पण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ‘आरपीआय’ला सोबत घेऊन आपल्याला १५१ जागा जिंकायच्याच आहेत’, असे सांगत शेलार यांनी सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले.



हेही वाचा

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, नड्डा यांचा दावा

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याची कल्पना फडणवीसांचीच - नाना पटोले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा