Advertisement

सरकारविरोधात मविआचा 'हल्ला बोल' मोर्चा, उद्धव ठाकरेही उतरले रस्त्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढला आहे.

सरकारविरोधात मविआचा 'हल्ला बोल' मोर्चा, उद्धव ठाकरेही उतरले रस्त्यावर
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विरोधी महाविकास आघाडीच्या (MVA) 'हल्ला बोल' निषेध मोर्चाला शनिवारी सुरुवात झाली.

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून  मोर्चाला सुरुवात झाली.

मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह महा वकास आघाडीचे सर्व नेते सहभागी आहेत. 

मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला.  राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य, तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान, राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य, महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील झालेत.   

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सकाळपासूनच जेजे रुग्णालयाजवळ जमू लागले होते. दुपारच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या हातात बॅनर, फलक, शिवाजी महाराज आणि फुले यांच्या प्रतिमा दिसत होत्या.

मोर्चापूर्वी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याच्या काही भागांवर दावा सांगून महाराष्ट्राचा अपमान केला आहे, तरीही शिंदे सरकारने प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा