नांदेडच्या विजयाचा मुंबईत जल्लोष


SHARE

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत गुरूवारी ८१ जागांपैकी ७१ जागा जिंकत काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. या विजयानं देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह संचारला असून दादरमधील टिळक भवनपुढे काँग्रेस कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करत आहेत.


काँग्रेसला नवसंजीवनी?

गेल्या तीन वर्षांपासून देशात इत्रतत्र सर्वत्र मोदी लाटेचा संचार असताना या लाटेच्या तडाख्यात सापडून काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत झाला की काय? असं चित्र देशभरात निर्माण झालं होतं. पण नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निकालांकडे बघून काँग्रेस सत्ताकारणाच्या कॅन्व्हासवर पुन्हा संकल्पचित्र रेखाटू शकतं, असा आशावाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.


प्रदेशाध्यक्षांची एकहाती लढत

नांदेडमध्ये महापालिकेची स्थापना झाल्यापासूनच येथे काँग्रेसची सत्ता आहे. पण मागच्या तीन वर्षांपासून भाजपाच्या सत्तेचा वारू ज्या पद्धतीनं देशभरात विजयी पताका लावत सुटला आहे. त्याकडं पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापुढं स्वत:च्या बालेकिल्ल्यातच मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एमआयएमच्या ओवेसी बंधूंनी स्वत: सभा घेऊन प्रचारात रंगत आणली. पण चव्हाणांनी एकहाती डावपेच लढवत घराच्या मैदानावर आपणच सरस असल्याचं दाखवून दिलं आहे.

नांदेड महापालिकेसाठी बुधवारी एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ६० टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत ५७८ उमेदवारांनी आपलं नशीब आजमवलं.


नांदेड महापालिकेचा निकाल:

एकूण जागाकाँग्रेसभाजपाशिवसेनाराष्ट्रवादीएमआयएमइतर
८१७१०५०१०००००३डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय