Advertisement

"राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

जेव्हा अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी जाईल. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

"राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!
SHARES

जेव्हा अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना (Coronavirus) जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं. 

सध्याच्या स्थितीत कुठल्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बरं करणं याला आमचं प्राधान्य आहे. परंतु काही लोकांना वाटतं की राम मंदिर ज्या दिवशी बनेल, त्या दिवशी कोरोना जाईल. म्हणूनच कदाचित अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असेल. परंतु आमच्यासाठी तरी कोरोना विषाणूचं संक्रमण रोखणं हाच प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, असं शरद पवार म्हणाले.  

हेही वाचा- Mahajobs: महाविकास आघाडी फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने विचारला प्रश्न

शरद पवार पुढं म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संकटामुळे लाॅकडाऊन लागू करावं लागलं. ज्याचा लहान-मोठ्या उद्योगांना फटका बसला. परिणामी आर्थिक संकट निर्माण झालं. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यातूनच हळुहळू परिस्थितीत बदल होऊ शकेल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, अयोध्या इथं राम मंदिराची कोन शीला ठेवण्यासाठी पुढील महिन्यातील २ तारखांचा पर्याय नुकताच सुचवण्यात आला आहे. २ आॅगस्ट आणि ५ आॅगस्ट अशा या दोन तारखा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोन शीला ठेवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.  

तर दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं की, प्रभू राम हे पक्षाच्या आस्थेचा विषय आहे. या मुद्द्यावर पक्षाकडून कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्यात येणार नाही. कारण राम मंदिर आंदाेलनात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आणि कारभार हाती घेतल्यानंतरही अयोध्येचा दौरा केला होता.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं ही या सरकारची प्राथमिकता आहे. रामराज्यात ज्या प्रकारे जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जात होत्या, तसाच प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा