Advertisement

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार
SHARES

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी पवार यांना २९ मते मिळाली, तर 'आप'चे धनंजय शिंदे यांना ३ मते, तर ३ जण गैरहजर होते.

शरद पवार गेली ४० वर्षे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत, तर उपाध्यक्ष पदाच्या ७ जागांसाठी चौदा उमेदवार होते. माजी आमदार विद्या चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर, शशी प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून किरण सोनवणे यांनी काम पाहिले. निवडणुकीत ३४ जणांपैकी ३१ जणांनी मतदान केले. शरद पवार यांना २९ तर धनंजय शिंदे यांना २ मते मिळाली. निवडणुकीत शरद पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार गेली ४० वर्षे ग्रंथालयाशी जोडलेले आहेत. ते १९९४ पासून ते अध्यक्ष आहेत, तर त्याआधी उपाध्यक्ष होते.

कार्यकारिणी सदस्य

जयवंत गोलतकर, सुरेंद्र करंबे, उदय सावंत, रवींद्र गावडे, सुनील राणे, विनायक परब, प्रदीप ओगले, हेमंत जोशी, मनीष मेस्त्री, शीतल करदेकर, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, सूर्यकांत गायकवाड, शिल्पा पितळे, स्वप्निल लाखवडे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा