Advertisement

१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही- शरद पवार

सध्या देशात १९७७ सारखीच परिस्थिती असून, सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे १९७७ ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी शक्यता पवार यांनी एका खाजगी वृत्तसंसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही- शरद पवार
SHARES

देशाच्या राजकारणात शरद पवार हे एक अदृश्य शक्तीसारखं काम करत असल्याचं अनेक नेते अापल्या भाषणातून बोलत असतात. याची प्रचिती देशाने तसंच महाराष्ट्रानेही अनुभवली अाहे. पवार जेव्हा बोलतात, तेव्हा राजकारणात उलथापालथ झाल्याचं आतापर्यंत अनेकदा दिसून अालं अाहे. अागामी काळातही अशाच राजकीय उलथापालथीचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले अाहेत. देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असं भाकित पवार यांनी केलं अाहे.


काय म्हणाले पवार?

सध्या देशात १९७७ सारखीच परिस्थिती असून, सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे १९७७ ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी शक्यता पवार यांनी एका खाजगी वृत्तसंसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.


'असं' कोसळलं होतं इंदिरा गांधी सरकार

देशामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर १९७७ ला सर्वच विरोधी पक्ष एकत्र अाले होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांचं सरकार कोसळलं होतं, असं पवार यांनी सांगितलं. सध्या केंद्रातील सरकार एकखांबी नेतृत्व चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली.



विरोधक एकवटण्यास सुरूवात

१९७७ मध्ये सर्व विरोधकांची जशी एकजूट झाली होती तशीच एकजूट अाता होण्यास सुरूवात झाली अाहे. त्यामुळे १९९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नसल्याचं पवार म्हणाले. देशात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला अाहे.

त्यामुळे सध्याचं हे जनमत लक्षात घेऊन समविचारी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. पवारांच्या या भाकितामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे अाहेत.



हेही वाचा-

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवार

अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा