Advertisement

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवार

शेतकऱ्यांनी आंदोलन करताना रस्त्यावर दूध ओतणे किंवा भाजीपाला टाकणे, असे प्रकार करू नयेत, आंदोलनात त्यांनी गरीब, सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. वस्तू रस्त्यावर टाकण्यापेक्षा त्या गरीबांमध्ये वाटाव्यात. सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, असं आंदोलकांनी वागू नये, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवार
SHARES

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, ही आश्वासने पाळण्याची त्यांची नियत देखील दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केलं.


शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

मी स्वतः शेतकरी असल्याने या संपाला माझा पाठिंबा आहे. समाजाने देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना पाठिंबा द्यावा, अशी आग्रही मागणी केली.


वस्तू गरीबांना द्या

तसंच शेतकऱ्यांनी आंदोलन करताना रस्त्यावर दूध ओतणे किंवा भाजीपाला टाकणे, असे प्रकार करू नयेत, आंदोलनात त्यांनी गरीब, सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. वस्तू रस्त्यावर टाकण्यापेक्षा त्या गरीबांमध्ये वाटाव्यात. सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, असं आंदोलकांनी वागू नये.


जनता सत्ताधाऱ्यांविरोधात

साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत कुठल्याही मार्गाने निवडणुका जिंकणं हाच सरकारचा मानस आहे. जे निवडणूक अधिकारी सरकारच्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वागले, त्यांना प्रशासनात ठेवण्यात येऊ नये. पालघर लोकसभा पोटनिवडणूक भलेही भाजपाने जिंकली असली, तरी जनता त्यांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे.


विरोधक एकत्र आल्यास...

देशात १० पैकी १ जागा जिंकणं ही सत्ताधाऱ्यांसाठी मोठी गोष्ट नाही. पण लोकशाहीवर विश्वास ठेवून, लोकमानस काय आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपा विरोधात सर्व विरोधक एकत्र आले, तर मी देखील या आघाडीत आनंदाने सहभागी होईल, असंही पवार म्हणाले.



हेही वाचा-

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - अशोक चव्हाण

इंधन कर कपातीविरोधात काँग्रेसचा 'ट्विट मोर्चा'



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा