Advertisement

इंधन कर कपातीविरोधात काँग्रेसचा 'ट्विट मोर्चा'

इंधन महागाईला विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसने २ जूनपासून ट्विट मोर्चा सुरु केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातील सभागृहात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

इंधन कर कपातीविरोधात काँग्रेसचा 'ट्विट मोर्चा'
SHARES

रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासोबतच वाढत्या इंधन महागाईला विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसने २ जूनपासून ट्विट मोर्चा सुरु केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातील सभागृहात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जोपर्यंत इंधनदर कमी होत नाही, तोपर्यंत हा मोर्चा सुरू राहणार असून या मोर्चाकडे दुर्लक्ष केल्यावर आम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिला.


कारण काय?

#CutFuelTaxes अर्थात 'इंधन करात कपात करा' हा हॅशटॅग वापरून काँग्रेसने भाजप सरकार विरोधात ट्विट मोर्चा सुरु केला आहे. संपूर्ण देशातील जनता पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे ट्रस्ट झालेली आहे. भाजपाचं सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ४ वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढतच आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर अनावश्यक भरमसाठ कर लावला जात आहे, हे यामागचं कारण आहे.


 

तोपर्यंत मोर्चा सुरूच

कर कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला ट्विट करून आम्ही विनंती करत आहोत. जोपर्यंत भाजप सरकार पेट्रोल आणि डिझेलचे जीएसटी अंतर्गत आणत नाहीत, तोपर्यंत आम्ही ट्विटरच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत राहू, असंही निरूपम म्हणाले.


तर, रस्त्यावर उतरू

आमच्या ट्विट मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही, तर आम्ही स्ट्रीट मोर्चाकडे वळू, असं काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी केली आहे.


 

सोशल मीडियाच्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या तासाभरातच #CutFuelTaxes या हॅश टॅग अंतर्गत ७ हजारांहून अधिक ट्विट मिळाले. या ट्विट मोर्च्यात काही सामाजिक संघटनांनी देखील सहभाग नोंदवला आहे.



हेही वाचा-

...तर सुभाष देशमुख मंत्रिपदाचा राजीनामा देणार?

यंदाचं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा