Advertisement

यंदाचं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच!

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आदेश जारी करत ४ जुलैपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच होईल, यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

यंदाचं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच!
SHARES

महाराष्ट्र विधानसभेचं यंदाचं पावसाळी अधिवेशन नेमकं कुठं होणार? मुंबईत की नागपूरमध्ये? याविषयीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आदेश जारी करत ४ जुलैपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच होईल, यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनी आगामी पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून सुरू होईल, अशी घोषणा केली होती. मात्र हे अधिवेशन मुंबईत होईल की नागपूरमध्ये होईल, याविषयी स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी आग्रही होते.



कारण काय?

मुंबईतील मनोरा आमदार निवास सध्या दुरूस्तीसाठी काढण्यात आल्याने आमदारांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती.



समितीत कोण?

संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई या तिघांची समितीत सामवेश होता.


नागपुरात अधिवेशन कधीपासून?

नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन घेण्यास १९६० पासून सुरूवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत केवळ दोनदाच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीआधी विदर्भातील मतदारांना खूश करण्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.



हेही वाचा-

'टायटॅनिक कमिंग सून' 'तुंबई'बाबत नितेश राणेंचं ट्वीटास्त्र

घटस्फोटाचा स्फोट नाहीच!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा