Advertisement

यंदाचं पावसाळी अधिवेशन नागपूरला की मुंबईत?

आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही असून, याचा निर्णय घेण्यासाठी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार या मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

यंदाचं पावसाळी अधिवेशन नागपूरला की मुंबईत?
SHARES

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली आणि आगामी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. यंदाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै २०१८ रोजी होईल, अशी घोषणा विधिमंडळात करण्यात आली असली तरी हे पावसाळी अधिवेशन नागपूरला की, मुंबईत याची घोषणा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.


अधिवेशन नक्की कुठे?

आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही असून, याचा निर्णय घेण्यासाठी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार या मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सर्वसाधारण एखादे अधिवेशन समाप्त होताना आगामी अधिवेशनाची तारीख आणि ठिकाणाची घोषणा करण्यात येते. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाची फक्त तारीख घोषित करण्यात आली. मात्र हे अधिवेशन नागपूर की, मुंबईत नक्की कुठे होणार हे जाहीर करण्यात आलं नाही.


अधिवेशन नागपूरमध्येच होण्याची शक्यता

येत्या ३ एप्रिल रोजी याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक होणार असून, या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरला की मुंबईत घ्यायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशनात राज्यभरातील सर्व आमदार येत असतात, त्यानुसार त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही करावी लागते. यंदा मुंबईत मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असल्यानं आमदारांच्या राहण्याची सोय होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारणास्तव सद्ध्या तरी यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्येच होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा