Advertisement

मुंडे वादावरून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब


मुंडे वादावरून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
SHARES

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी मांडण्यासाठी आणि सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवले आहे. या वृत्तानंतर गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू होताच सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला.


मुंडेंविरोधात घोषणाबाजी

सत्ताधारी आमदार वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे सुरुवातीला कामकाज स्थगित होऊन पुन्हा 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा सत्ताधारी आमदारांकडून सभागृहात धनंजय मुंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान सत्ताधारी आमदारांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं निलंबन करा, अशी मागणी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा