अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार?

 Pali Hill
अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार?

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. पक्षाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर आता खुद्द सुनील तटकरे यांचे पुतणे, आमदार अवधूत तटकरेही नाराज असल्याचं वृत्त आहे. अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाडला दौरा केला होता, तेव्हा स्वत: अवधूत तटकरे स्वागतासाठी हजर होते. आमदार झाल्यापासूनच अवधूत तटकरे यांचे काका सुनील तटकरे यांच्यासोबत खटके उडत होते, अशीही माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे लवकरच अवधूत तटकरे शिवसेनेत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Loading Comments