• घाटकोपरमध्ये तीन नवीन हायमास्ट
  • घाटकोपरमध्ये तीन नवीन हायमास्ट
SHARE

घाटकोपर - महानगरपालिका निवडणूक जवळ आल्यानं नगरसेवकांनी विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाकाच लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग 126च्या नगसेविका प्रतीक्षा घुगे यांनी घाटकोपर पश्चिमेस तीन ठिकाणी उभारलेल्या हायमास्ट दिव्यांचं रविवारी रात्री 9.30नंतर उद्घाटन करण्यात आलं.

छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायमास्ट (दीपस्तंभ) गोपाल भवन सिग्नल येथे उभारण्यात आला आहे. तर श्री चिंतामणी पार्श्वनाथ दीपस्तंभ श्रेयस सिग्नलला उभारण्यात आलाय. पाटीदारवाडीमधील सरदार वल्लभाई पटेल चौकातही एक दीपस्तंभ उभारण्यात आलाय. या तिन्ही दीपस्तंभांचं उद् घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. हे तिन्ही दीपस्तंभ प्रतीक्षा घुगे यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या