Advertisement

वसंत डावखरे यांचं निधन


वसंत डावखरे यांचं निधन
SHARES

विधानपरिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांचं शुक्रवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक वजनदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.


शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांच्या मागे मुलगा आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ठाण्यातील हरी निवास येथील गिरीराज हाइट्समध्ये सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.


डावखरे यांची राजकीय कारकीर्द

वसंत डावखरे यांची राजकीय कारकीर्द ठाणे शहरात बहरली. १९९२ साली डावखरे राज्य विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग १८ वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषवले. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. राजकारणात राहून सर्वांशी घट्ट मैत्री केली त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘वसंतोत्सव' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा