राष्ट्रवादीनं आता तरी धडा घ्यावा - अशोक चव्हाण

 Pali Hill
राष्ट्रवादीनं आता तरी धडा घ्यावा - अशोक चव्हाण
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेऊन आघाडी केली असती तर दोन्ही पक्षाला फायदा झाला असता अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. विधानपरिषद निवडणुकासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असती, तर दोन्ही पक्षांच्या 3- 3 जागा सहज निवडून आल्या असत्या. मात्र राष्ट्रवादीच्या असमजूतदारपणामुळे आघाडी होऊ शकली नसल्याचंही ते यावेळी म्हणालेत. त्याचबरोबर आघाडीचा फायदा दोन्ही पक्षाला होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीने काँग्रेसने मागणी केलेल्या सांगली-सातारा आणि यवतमाळ या जागा काँग्रेसला सोडल्या असत्या तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते. मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसला जागा सोडण्यापेक्षा शिवसेना आणि भाजप या जातीयवादी पक्षांशी युती केल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. दरम्यान राष्ट्रावादी काँग्रेसनं या निकालातून धडा घेऊन भविष्यात शिवसेना भाजपला फायदा होऊ नये म्हणून योग्य भूमिका घ्यावी असं अशोक चव्हाण यांनी सांगत राष्ट्रवादीला चिमटा काढला.

Loading Comments