Advertisement

राष्ट्रवादीच्या 'या' कार्यकर्त्यांने रक्ताने लिहले शरद पवारांना पत्र

शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हजारो नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या 'या' कार्यकर्त्यांने रक्ताने लिहले शरद पवारांना पत्र
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी त्यांच्या रक्ताताचा वापर करून शरद पवारांना पत्र लिहिले. शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती काळे यांनी केली.

पत्रात काळे यांनी शरद पवार यांचा ‘मार्गदर्शक’ असा उल्लेख केला असून त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने पक्षाचे कार्यकर्ते ‘पोरके’ झाल्याचे म्हटले आहे.

"तुमच्या या धक्कादायक घोषणेमुळे आम्ही पोरके झालो आहोत," असे त्यांनी लिहिले.

त्यांनी पवारांना राजीनामा देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. 

"तुमचा निर्णय कोणालाच मान्य नाही. पवारसाहेब, तुम्ही आमचे आराध्य दैवत आणि गुरू आहात. कृपया तुमचा निर्णय बदला," असं काळे यांनी पत्रात लिहिलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केले की त्यांनी पक्षप्रमुखपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हजारो नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या आहेत.

शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली की, पवार साहेबांना निर्णयाचा फेरविचार करण्यास दोन-तीन दिवस लागतील. 

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करणारे पवार यांनी गेली 24 वर्षे पक्षाचे प्रमुखपद भूषवले आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर करताना आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. भविष्यातील कृतीचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची समिती नेमण्याची शिफारस त्यांनी केली.

या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पीसी चाको, नरहरी झिरवाळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गाडे यांचा समावेश असेल, असे ते म्हणाले.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा