राज्यामधील महाविकास आघाडी सरकारला १00 दिवस पूर्ण झाल्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवसस्थान असणार्या वर्षा बंगल्यावर आपला मुक्काम हलवलेला नाही. मुख्यमंत्री राज्याचा कारभार त्यांचे खासगी निवसस्थान असणार्या मातोश्री बंगल्यावरुनच चालवतात. मात्र यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
हेही वाचाः-चव्हाणांचे ते मत ऐकले असते तर, बाबरी पडलीच नसती - शरद पवार
मलबार हिल येथील वर्षा बंगला हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप झाले. तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र मातोश्रीवरच राहण्याचा निर्णय घेतला. सरकार स्थिर झाल्यानंतर काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तसं काहीच घडलं नाही आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुनच राज्याचा कारभार पाहत आहेत. मात्र यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांवर दुहेरी दबाव पडत आहे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. यासंदभार्तील बातमी एका मराठी वेबसाईटने दिल्यानंतर त्या बातमीचा आधार घेत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचाः- छत्रपती शिवाजी महाराज पार्क!
उद्धव ठाकरेंनी शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन, पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याच्या बातमीचा आधार घेत या निर्णयामागे एक कारण असल्याचा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंना ही भीती आहे की केंद्र सरकारचे किंवा पवार साहेबांचे हेर त्याठिकाणी (वर्षा बंगल्यावर) असतील. आतल्या गोष्टी बाहेर जातील आणि मग ठाकरेंचे व्यवहार कळतील. त्या भीतीने उद्धव ठाकरे मातोश्री सोडणार नाही, असे ट्विट निलेश यांनी केले आहे.