जीएसटी विरोधात विक्रीकर विभाग आक्रमक


SHARE

डॉकयार्ड - जीएसटीच्या जाचक अटीविरोधात विक्रीकर विभाग गट क्रमांक ड आणि महाराष्ट्र विक्रीकर संघटना आक्रमक झालेत. जीएसटीमधील काही तरतूदींसाठी या दोन्ही संघटनांनी बुधवारी एक दिवसीय लेखनी बंद आंदोलन पुकारलंय. जीएसटीमुळे राज्यातील विक्रीकराचे हक्क केंद्राकडे जाणार आणि त्यांंचेच अधिकारी जीएसटीचा कर गोळा करणार त्यामुळे जे कर्मचारी वर्षांनुवर्ष काम करतात त्यांच्या पोटावर पाय येईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विक्रीकर संघटनेच्या प्रमुखांनी यावेळी दिली. त्यामुळे सर्व हक्क हे केंद्राकडे न जाता राज्याकडे यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या