Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर

एका सामुदायिक कार्यक्रमासाठी मोदी मुंबईत येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी येथून वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. सीएसएमटी-शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. एका सामुदायिक कार्यक्रमासाठी मोदी मुंबईत येणार आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास अवघ्या साडेसहा तासांचा होणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस देखील पाच तास ५५ मिनिटांचा प्रवास करेल.

वंदे भारत चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बांधले जात आहे. हे डबे जीपीएस आधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने सुसज्ज असतील. प्रत्येक 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला 16 एसी डबे आहेत. तर एका ट्रेनची प्रवासी क्षमता 1,128 आहे.

सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस (गुरुवार वगळता) 5 तास आणि 55 मिनिटे प्रवास करेल. ती सीएसएमटी येथून संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल आणि शिर्डी येथे दुपारी 12.00 वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल.

दरम्यान, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ती सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि 12.35 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबेल.



हेही वाचा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

सत्ता परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून! शिंदे-फडणवीस युतीला मोठा धक्का?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा