SHARE

घाटकोपर - उमेदवारांना अर्ज भरण्याची सोय पंतनगरमधील महापालिका मराठी शाळा क्र. दोनमध्ये करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत 3 फेब्रुवारीपर्यंत असल्याने इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या वेळी सर्व उमेदवारांना शांततेने अर्ज भरता यावे तसंच शाळेतील विद्यार्थ्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नारिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं उपायुक्त राजेश प्रधान यांनी सांगतलं. तर यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचं अमेय वाघ या विद्यार्थ्याने सांगतले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या