Advertisement

रेल्वेतल्या शिकाऊ उमेदवारांनी घेतली राज यांची भेट


रेल्वेतल्या शिकाऊ उमेदवारांनी घेतली राज यांची भेट
SHARES

दादर - महाराष्ट्रात रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करणाऱ्या 1 हजार 500 विद्यार्थ्यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंज इथे 11 वाजता जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. हे विदर्यार्थ्यी 30 जानेवारीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी नोकरीसंदर्भात चर्चा करायला दिल्लीला गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अमानूषपणे लाठीचार्ज करून मारहाण केली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आपला मार विसरू नका. माझे तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे, असे आश्वासन राज ठाकरे यांनी रेल्वे अप्रेंटीशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा