'पालिका अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा'

  Dadar
  'पालिका अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा'
  मुंबई  -  

  मुंबई - खड्ड्यांवरून सुरू झालेले राजकारण दिवसेंदिवस पेटतच चालले आहे. मनसे नगरसेवक विरूद्ध महापालिका अभियंता-प्रशासन असा वाद विकोपाला गेल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडड्याप्रकरणी उडी घेतली आहे. खड्डयांना जबाबदार असलेल्या महापालिका अभियंत्यांविरोधात गुन्हे दाखल करा, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना दिले आहेत.

  मनसे नगरसेवक संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, असून त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खड्डयावरून सुरू झालेल्या या पालिका अभियंते-मनसे वादाची गंभीर दखल राज ठाकरे यांनी घेतली. त्यानुसार नुकतीच त्यांनी पदाधिकार्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत अभियंत्यांविरोधातच तक्रार दाखल करण्याचे आदेश पदाधिकार्यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दाखल केल्याचे समजते आहे. तर अंधेरी मनसे नगरसेवक मनीष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेविषयी म्युन्सिपल इंजियनर्स असोसिएशनचे सुखदेव काशीद यांना विचारले असता त्यांनी अभियंत्यांविरोधात तक्रारी, गुन्हे दाखल होऊ दे मग आम्ही पुढे काय करायचे ते बघू असे सांगितले आहे. तर आयुक्तच पुढे काय तो निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.