Advertisement

परप्रांतीय कलाकाराची राज ठाकरेंना वाढदिवसाची अनोखी भेट

व्यंगचित्रकार असलेल्या राज ठाकरे यांना खास शुभेच्छा-भेट देणारा कानपूरमधील कलाकार अमति वर्मा यानं केवळ पाच मिनिटं पाच सेकेंदात राज ठाकरे यांचं पोर्टेट तयार केलं आहे. त्याचा पोर्टेट बनवतानाचा व्हिडिओ नुकताच त्याने आपल्या फेसबूक पेजवर अपलोड केला असून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

परप्रांतीय कलाकाराची राज ठाकरेंना वाढदिवसाची अनोखी भेट
SHARES

गुरूवारी, १४ जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे यांच्या दादर इथल्या कृष्णकुंज या घरी कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी मोठी गर्दी करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकीकडे वाढदिवसाचा मुहूर्त साधत मनसेनं स्वस्त पेट्रोल मुंबईकरांना उपलब्ध करून दिलं. तर दुसरीकडं कुणी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक आणला होता तर कुणी भेटवस्तू घेऊन आलं होतं. यावेळी अनेकांनी ढोल-ताशांच्या गजरात राज यांना शुभेच्छा दिल्या. पण या सर्व शुभेच्छांमध्ये एक शुभेच्छा वा भेट खास आणि वेगळी ठरली.स्वत एक कलाकार, व्यंगचित्रकार असलेल्या राज ठाकरे यांना खास शुभेच्छा-भेट देणारा आवलियाही कलाकारच असून त्यानं केवळ पाच मिनिटं पाच सेकेंदात राज ठाकरे यांचं पोर्टेट तयार केलं आहे. या आवलियाचं नाव अमित वर्मा असून तो राज ठाकरे यांचा चाहता असल्याचं समजतं आहे. अमितनं त्याच्या फेसबुक पेजवर पाच मिनिटं पाच सेकंदात पोर्टेट बनवतानाचा व्हिडिओ नुकताच अपलोड केला असून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.


परप्रांतीयही राज ठाकरेंचे चाहते

अमित वर्मा हा उत्तर प्रदेशमधील कानपूरचा रहिवासी आहे. तर कानपूरमधील प्रसिद्ध चित्रकार अशीही त्याची ओळख आहे. राज ठाकरे यांचा राज्यात मोठा चाहता वर्ग असून त्यातही मराठी तरुणांची संख्या त्यात अधिक आहे. पण अमित वर्माच्यानिमित्तानं राज्याबाहेरील परप्रातियांमधील तरूणांनाही राज ठाकरे आकर्षित करत असल्याचं समोर आलं आहे. त्यातही विशेष म्हणजे राज ठाकरे नियमित परप्रांतियांविरोधी भूमिका घेत असताना.

संबंधित विषय
Advertisement