Advertisement

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

गेल्या काही महिन्यांपासून सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन
SHARES

राज्यसभेचे खासदार अमर सिंग यांचे सिंगापूरमध्ये निधन झाले आहे.सिंगापूरच्या Mount Elizabeth Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यसभा खासदार अमर सिंह, राज्यसभेचे सदस्य आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे शनिवारी दुपारी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं. 

किडनीच्या आजारावर गेले काही वर्ष अमर सिंह उपचार घेत होते. जवळपास सहा महिन्यांपासून सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई मिररनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ते आयसीयूमध्ये होते आणि त्याचे कुटुंब तिथं असल्याचं सांगितलं होतं. 

२०१३ मध्ये अमर सिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. २०१३ मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.

समाजवादी पक्षाचे ते माजी नेते होते. गेल्या काही महिन्यांपासून सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे ते निकटवर्ती समजले जातात.

अमरसिंह यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल पाहता असं दिसून येतं की ते आजारी असूनही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव होते. गेल्या वेळी अमर सिंह यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तेव्हा अमर सिंह यांनी स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ जाहीर केला होता. त्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूची अफवा असवल्याचं म्हटलं होतं. याशिवाय माझी प्रकती ठिक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 
संबंधित विषय
Advertisement