चेंबूरमध्ये मनसेला बसणार फटका?

  Chembur
  चेंबूरमध्ये मनसेला बसणार फटका?
  मुंबई  -  

  चेंबूर - पालिका निवडणुका तोंडावर असताना देखील मनसेकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने अनेक वर्षे पक्षासाठी काम करणारे कट्टर कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकण्याचा तयारीत आहेत. 'पक्षातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे चेंबूरमध्ये पक्षाचे वर्चस्व कमी झाले आहे', 'त्यामुळे मनसेमधून निवडणूक लढल्यास नागरिकांचा पाठिंबा मिळणार नाही', त्यापेक्षा पक्षांतर करणंच योग्य ठरेल' अशी प्रतिक्रिया चेंबूरमधील एका मनसे कार्यकर्त्याने व्यक्त केली. यासह 'लवकरच इतर कार्यकर्तेही या पक्षाला रामराम करणार' असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.