Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन


डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन
SHARES

मुंबई - राज्य सरकारचा उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन प्रकाशित केले जाते. आतापर्यंत समितीच्या वतीने एकूण २४ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यापैकी दोन खंड मराठीत तर उर्वरित खंड इंग्रजीत आहेत. डॉ. आंबेडकर यांची साहित्य संपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, हा या मागचा हेतू आहे. त्यामुळे या ग्रंथाची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. हे वर्ष डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण आणि नवे ग्रंथ समिती तर्फे प्रकाशित केले जात आहेत, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा