राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली

 Dindoshi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली
See all

दिंडोशी - दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालाड दिंडोशी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांनी रविवारी रॅलीचं आयोजन केलं होतं. मालाड पूर्वेकडील सावरकर उदयान ते ओबेरॉय मॉलपर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी 2 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी रॅलीत सहभाग घेतला होता. दिंडोशी येथे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी या रॅलीचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेविका सुचित्रा नाईक, दिंडोशी महिला मोर्चाच्या भारती भेंडे, दिंडोशी कोकण विभागाचे अध्यक्ष संकेत नलावडे उपस्थित होते.

Loading Comments