शिवसेना-भाजपात रावण दहनावरून रामायण


  • शिवसेना-भाजपात रावण दहनावरून रामायण
SHARE

मुलुंड - रावण दहनावरून शिवसेना आणि भाजपामध्ये मंगळवारी संध्याकाळी राडा झाला. संतप्त शिवसैनिकांनी रावणाच्या पुतळ्याचं दहन होण्यापूर्वीच त्याची मोडतोड केली. भाजपा खासदार किरीट सोमैया यांच्या मुलुंडमधील कार्यालयाजवळ सोमैया यांच्याहस्ते रावण दहन करण्यात येणार होतं. या वेळी काही शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. आमने-सामने आलेल्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीस सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकारानंतर शिवसेनेच्या गुंडगिरीला आपण घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया सोमैया यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या