Advertisement

उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का, आणखी एक खासदार शिंदे गटात

आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.

उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का, आणखी एक खासदार शिंदे गटात
SHARES

मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते. 

दक्षिण - मध्य मुंबईचे खासदार, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आणि माहीमचे आमदार  सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने, शिवसैनिक आणि मुंबईतील जनतेच्या वतीने, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार होत आहे. या कार्यक्रमात गजानन किर्तीकर, रामदास कदम, राहुल शेवाळे उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा