शिवसेनेने उडवली किरीट सोमय्यांची खिल्ली

 Mumbai
शिवसेनेने उडवली किरीट सोमय्यांची खिल्ली

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा यांच्या मधील आरोप-प्रत्यारोप वाढतच आहेत. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली स्वतःची संपत्ती जाहीर करण्याचं आवाहन केलं. याच मुद्द्यावरून मंगळवारी मुलुंड जिमखाना येथे शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. 'किरीट सोमय्या आजारी आहेत' , 'गेट वेल सून' असे बॅनर घेऊन परिसरात लोकांना पुष्पगुच्छ वाटण्यात आली. तसंच हे पुष्पगुच्छ किरीट सोमय्यांना नेऊन देण्याचं आवाहनही लोकांना करण्यात आलं. या अनोख्या आंदोलनाने शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची खिल्ली उडवत निषेध व्यक्त केला.

Loading Comments