शिवसेनेचे अमराठी कार्ड

Malad
शिवसेनेचे अमराठी कार्ड
शिवसेनेचे अमराठी कार्ड
See all
मुंबई  -  

मालाड – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनंतर शिवसेनेनेही अमराठी मतदार वळवण्यसाठी प्रयत्न करतेय असं दिसतय. याच धर्तीवर मालाड, चारकोपमध्ये मराठी शाखाप्रमुख बदलून त्या जागी अमराठी शाखाप्रमुखांची वर्णी लागलीये.

मालाड मालवणीतील मुस्लीम समाजाची लक्षणीय संख्या पाहता मालवणीतील प्रभाग 48 मधून बाळा बाईत यांना वगळून शाबीर शेख या मुस्लीम कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आलीय. चारकोपमध्ये मराठी वस्ती असून इतर प्रभागांमध्ये असलेली मारवाडी, गुजराती मते पाहता तिथे गुजराती कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आलीय. चारकोप प्रभाग 30 मध्ये आनंद पवार या शाखाप्रमुखांना हटवून उदय रुघानी यांची नेमणुक करण्यात आलीये. तर प्रभाग 31 मधील सुरेश गुरव यांना हटवून मारवाडी समाजाचे लालसिंग राज पुरोहित, प्रभाग 45 मध्ये प्रदीप ठाकूर यांच्या जागी उत्तर भारतीय असलेल्या विकास गुप्ता यांना नेमण्यात आलय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.