अयोध्या दौरा हा केवळ मतांसाठी, अशोक चव्हाणांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला काहीही अर्थ नाही. आगामी लोकसभा आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याचं जाहीर केलं आहे.

SHARE

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलला असून २५ नोव्हेंबरला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्यावरून काँग्रेसने आता त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.  उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा केवळ मतांसाठी असून हे जनतेलाही उमगल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केली आहे. पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदारांना भुलवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उचलत अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरेंचा पुढाकार

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं आश्वासन देत भाजपा सत्तेत आली. पण गेल्या चार वर्षात प्रत्यक्षात भाजपानं राम मंदिर उभारण्याच्यादृष्टीनं काहीही केलं नाही. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांनी पुढं येत राम मंदिर तुम्ही उभारता का आम्ही असा सवाल करत २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करण्याचं जाहीर केलं आहे. या दौऱ्यात ते संत समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करत राम मंदिराबाबत त्यांची काय भूमिका आहे हे समजून घेणार आहेत.


मतांसाठी दौरा 

उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यावर चव्हाण यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला काहीही अर्थ नाही. आगामी लोकसभा आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं हा दौरा केवळ मतांसाठी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.हेही वाचा - 

फडणवीस सरकारची शिकार महाराष्ट्र करेल; व्यंगचित्रातून राज यांचा फटकारा

कोरेगाव-भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री जबाबदार- प्रकाश आंबेडकर
संबंधित विषय
ताज्या बातम्या