Advertisement

उद्धव ठाकरेंच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला, धावपट्टीवर आली नीलगाय


उद्धव ठाकरेंच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला, धावपट्टीवर आली नीलगाय
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौराकरून रविवारी दुपारी परतीच्या प्रवासाला निघाले असताना यांच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला.
अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून उद्धव ठाकरे यांचं विमान उड्डाण घेत असताना अचानक धावपट्टीवर नीलगाय आली. परंतु, त्यानंतर कोणत्याही अडथळ्याविना विमानाने उड्डाण केलं.


'ती' दृश्य कॅमेऱ्यात कैद

अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून मुंबईत परतत असताना विमानात उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे होते. दरम्यान, नीलगाय आल्याची दृश्य विमानतळावर उपस्थित असलेल्या मीडिया प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाली.


याची चौकशी होणार

उद्धव ठाकरे यांच्या विषेश विमानानं अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून यशस्वीरित्या उड्डाण घेतल्यामुळं संकट टळलं. परंतु, धावपट्टीवर अचानक नीलगाय कशी आली? याची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा