Advertisement

राम मंदिर चुनावी जुमला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला पुन्हा टोला

मुंबई महापालिकेच्या अद्ययावत पत्रकार कक्षाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलताना त्यांनी भाजपाच्या धोरणांवर हल्ला चढवला. माध्यमांची मुस्कटदाबी करत भाजपा देशात छुप्या पावलांनी आणीबाणी आणत असल्याचा आरोपही यावेळी उद्धव यांनी केला.

राम मंदिर चुनावी जुमला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला पुन्हा टोला
SHARES

राम मंदिर बांधण्याचं आश्वासन देत भाजपा सत्तेत आलं. पण गेल्या ४ वर्षांत राम मंदिर बांधण्यासाठी भाजपानं काहीच केलं नाही. आता निवडणुका आल्या म्हणून त्यांना राम मंदिराची आठवण झाली आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा ते पुन्हा राम मंदिर विसरणार. त्यामुळं १५ लाख रुपये जनतेच्या खात्यात जमा करण्याचा जसा चुनावी जुमला होता; तसाच राम मंदिर देखील चुनावी जुमला असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबई महापालिकेच्या अद्ययावत पत्रकार कक्षाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलताना त्यांनी भाजपाच्या धोरणांवर हल्ला चढवला. माध्यमांची मुस्कटदाबी करत भाजपा देशात छुप्या पावलांनी आणीबाणी आणत असल्याचा आरोपही यावेळी उद्धव यांनी केला.


पहिले मंदिर मग सरकार

उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाजपाला टार्गेट करताना दिसत आहेत. मंगळवारी पत्रकार कक्षाच्या उद्धघाटनची संधीही त्यांनी सोडली नाही. २४ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असून आपल्या या घोषणेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवडणुका आल्या म्हणून मी राम मंदिराचा मुद्दा घेतला, असं म्हटलं जात आहे. हो, आम्ही घेतला हा मुद्दा. कारण पहिले मंदिर मग सरकार हा नारा मी दिला आहे. त्यानुसार मंदिर हाच विषय आता महत्त्वाचा असणार असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

२४ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असून राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर अयोध्येत सभा घ्यायची की नाही हे अजून ठरवलेलं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा-

उद्धव ठाकरे म्हणताहेत, पहले मंदिर फिर सरकार

अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदीतून तासभर भाषण करणार?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा