गिरगावात शिवसेनेचा निर्धार मेळावा

 Girgaon
गिरगावात शिवसेनेचा निर्धार मेळावा
गिरगावात शिवसेनेचा निर्धार मेळावा
See all

गिरगाव - अागामी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आणि पालिकेत सत्ता टिकवण्याठी सी विभाग प्रभाग क्रमांक 219 आणि 220 च्या वतीने गिरगावामधील आर्यन शाळेत गुरूवारी ‘निर्धार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने खासदार अरविंद सावंत, नगरसेवक ,विभागप्रमुख,शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने निर्धार मेळाव्यात उपस्थित होते. शिवसेनेत ताकद काय आहे, शिवसेना काय करू शकते हे येत्या पलिका निवडणुकीत दाखवून देऊ. लोकांकडे मत मागू नका, पलिकेने काय काम केले लोकांना दाखवून द्या. पालिकेत भगवा भडकवल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलाय.

Loading Comments