Advertisement

यशवंत जाधवांना झटका, ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

शिवसेना नेते यशवंत जाधव यांना मोठा झटका बसला आहे.

यशवंत जाधवांना झटका, ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त
SHARES

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना मोठा झटका बसला आहे. यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाकडून (Income Tax) तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत.

याशिवाय जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भायखळ्यात २६ फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

आधी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि ५० लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी ७५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं.

यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली होती. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रोख दिले, गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटींचे पेमेंट केलं, ‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ पाठवले, असे उल्लेख होते.

याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली असता त्यांनी डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे आपली आई असल्याचे सांगितले होते. आपल्याला दानाची २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. याचा वापर आपण हिंदू नववर्ष – गुढीपाडव्याच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी केला.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये ३१ फ्लॅट खेरदी केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना ३० ते ३५ लाख रुपये दिल्याचा बोललं जातं. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे.



हेही वाचा

किरीट सोमय्या, नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

"असत्यमेव जयते..." ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा