'किरीट सोमय्या बिल्डरचे दलाल'

  Mumbai
  'किरीट सोमय्या बिल्डरचे दलाल'
  मुंबई  -  

  दादर - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तुटल्याने आता भाजापा-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यातल्या शाब्दिक वादाला राजकीय वर्तुळात विषेश रंग आलेला पाहायला मिळत आहे.

  'शिवसेनेच्या नेत्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास त्यांचे खरे रुप उघडकीस येईल' असा आरोप किरीट सोमय्या यांनी नुकताच केला होता. त्याला राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'किरीट सोमय्या हे कुप्रसिद्ध बिल्डरांचे दलाल आहेत. कचरा डम्पिंग ग्राऊंडसंदर्भात सोमय्या यांच्याकडून लोकांमध्ये वारंवार संभ्रम पसरवला जात आहे. मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडसाठी कोर्टाच्या नियमांचे पालन महापालिकेकडून केले जाईल. मी आत्तापर्यंत कोणत्याही कंत्राटदाराला आणि पालिका अधिकाऱ्यांना पाठिशी घातलेले नाही. परंतु कचरा टाकण्यासाठी तळोजा आणि ऐरोलीची जागा राज्यसरकारने 21 तारखेच्या आत हस्तांतरीत करावी, अन्यथा मुंबईतला सर्व कचरा किरीट सोमय्या आणि अशिष शेलार यांच्या घरात टाकू' असा इशाराही यावेळी शेवाळे यांनी दिलाय.

  'सोमय्यांच्या संपत्ती चौकशीच्या आव्हानाला आम्ही भीक घालत नाही, शिवसेनेचे शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे. कधीही चौकशी केली तरी आम्ही चौकशीला तयार आहोत. डम्पिंग ग्राऊंडमध्ये घोटाळे करणारे भाजपाचे खासदार आणि बिल्डर संजय काकडे आहेत. त्यांची देखील चौकशी करावी. त्याचबरोबर जय श्रॉफ यांच्यासोबत अशिष शेलार यांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी' अशी मागणीही शेवाळे यांनी यावेळी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.