...तर हा आहे मोदींचा पुढचा शॉक?

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि एकच गोंधळ उडाला. सर्व बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे देशातला काळा पैसा मुख्य प्रवाहात येईल असा दावा केला जात आहे. कर्नाटकात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णयाचं जोरदार समर्थनदेखील केलं. मात्र त्याचबरोबर 31 डिसेंबरनंतर कदाचित आणखीन एक शॉक देण्याबद्दलचं सूचक वक्तव्य मोदींनी केलं. त्यामुळे हा शॉक काय असावा याविषयी चर्चा सुरु झाल्यायत. रिझर्व्ह बँकेने काही प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये याचं उत्तर कदाचित सापडू शकेल. मुंबई लाइव्हनं या जाहिरातीतल्या याच हिंटचा मागोवा घेतलाय... आणि हे जर खरं ठरलं, तर कदाचित 31 डिसेंबरनंतर संपूर्ण चलन व्यवस्थाच नव्या रुपात दिसू लागण्याची शक्यता आहे.

Loading Comments