Advertisement

...मग शिवसेनेला ममता का नाही चालणार ?


...मग शिवसेनेला ममता का नाही चालणार ?
SHARES

मुंबई - मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केल्याचं सुत्रांनी सांगितलं. आम्ही मोदींच्या विरोधात नाही पण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असंही उद्धवनी स्पष्ट केलं.

बैठकीनंतर पत्रकांराशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. "नोटबंदीमुळे देशवासी त्रस्त झाले आहेत. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याची गरज आहे. या नोटबंदीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. नोटबंदीच्या संदर्भात बुधवारी शिवसेना आणि तृणमूल कांग्रेसचे शिष्टंमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणारायेत," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा