मिरा- भाईंदर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

  Churchgate
  मिरा- भाईंदर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले
  मुंबई  -  

  मिरा- भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० ऑगस्ट २०१७ रोजी मतदान होणार असून २१ ऑगस्ट २०१७ रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी शनिवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी राज्य निवडणूक कार्यालय येथे केली.

  मिरा- भाईंदर महापालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०१७ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण २४ प्रभागातील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे २६ जुलै ते २ ऑगस्ट २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ३ ऑगस्ट २०१७ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

  नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना ७ ऑगस्ट २०१७ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २० ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल, अशी माहिती सहारिया यांनी दिली.


  मिरा- भाईंदर एक दृष्टिक्षेप :

  • एकूण लोकसंख्या- ८,०९,३७८
  • मतदार (सुमारे)- ५,९३,३४५
  • एकूण प्रभाग- २४
  • एकूण जागा- ९५ (महिला ४८)
  • सर्वसाधारण- ६४ (महिला ३२)
  • अनुसूचित जाती- ४ (महिला २)
  • अनुसूचित जमाती- १ (महिला १)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग- २६ (महिला १३)  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.