का आहे यंदाची निवडणूक खास?

  Mumbai
  का आहे यंदाची निवडणूक खास?
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी काही खास आणि नवीन गोष्टी पहायला मिळाल्या. प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा वापर तर मोठ्या प्रमाणात झालाच मात्र त्यासोबतच यावेळी बॅनरबाजीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.

  1) मतदान केंद्रांवर उमेदवारांची माहिती - यावेळी निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदान केंद्रांवरच उमेदवारांच्या संपत्तीची माहिती तसेच त्यांच्यावर असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती देखील दिली जाणार आहे.

  2) अंध, वरिष्ठ नागरिकांना डोली - मतदानाच्या दिवशी अंध, वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष डोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर या मतदारांना जाताना त्रास होऊ नये म्हणून विशेष डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

  3) सोशल मीडियाचा पुरेपर वापर - यावेळी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेचे DID YOU KNOW चे बॅनर तर भाजपाने कार्टून आणि अॅनिमेशनच्या माध्यमातून शिवसेनेवर प्रहार केला.

  4) शिवसेना-भाजपाचा 'एकला चलो'चा नारा - 25 वर्षांनंतर शिवसेना आणि भाजपा प्रथमच ही निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे.

  5) पहिल्यांदाच किन्नर समाजाची उमेदवार रिंगणात - पहिल्यांदाच किन्नर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रिया पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.

  6) चार्टर्ड प्लेनद्वारे मतदानावर नजर - मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग मतदानावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नजर ठेवणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.