…म्हणून होते ‘खळ्ळ खट्याक’

Dadar , Mumbai  -  

दादर – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम, दाम, दंड, भेद यापैकी ज्याची गरज भासेल त्या सगळ्याचा वापर केला जाईल, अशी स्पष्टोक्ती मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. ‘मुंबई लाइव्ह’च्या 'उंगली उठाओ' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मर्जी राखण्यासाठी संदीप देशपांडे नेमके काय करतात, याचे उत्तर देतानाच 2019 मध्ये आमदारकी मिळवायची आहे का? यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्याचवेळी पत्नी नोकरी सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. ‘खळ्ळ खट्याक’पर्यंत एखादी गोष्ट का पोहोचते याचेही विश्लेषण त्यांनी केले.

Loading Comments