Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सनी केली मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सनी केली मागणी
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हॅकरनं खातं हॅक केल्यानंतर चक्क बिटकॉईनची मागणी केली. यासंबंधी एक ट्विटही करण्यात आलं होतं. हॅकर्सनी ट्वीट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी द्या असं लिहिलं गेलं होतं. पण त्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


काय म्हटलं हॅकरनं?

हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, 'कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावं असं मी आपणास अपील करतो'. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्विटरनंही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटची लिंक अकाऊंट असल्याची कबुली दिली आहे.


ट्विटर काय म्हणालं?

ट्विटरनं रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाइटवरील हॅक झालेल्या ट्विटर हँडलविषयी त्यांना माहिती आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी पावलं उचलली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइट narendramodi.in चे ट्विटर अकाउंट @narendramodi_in चे २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.


पेमेंट मॉलचा उल्लेख का?

30 ऑगस्ट रोजी सायबर सिक्युरिटी फर्म सायबलनं दावा केला की, पेटीएम मॉलच्या डेटा चोरीमध्ये जॉन विक ग्रुपचा हात होता. पेटीएम मॉल युनिकॉर्न ही पेटीएमची ई-कॉमर्स कंपनी आहे. या हॅकर गटाने खंडणी मागितल्याचा दावा सायबल यांनी केला होता. मात्र पेटीएमनं नंतर दावा केला की, त्याच्या डेटामध्ये कोणताही भंग झाला नाही.


बिटकॉन म्हणजे?

बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन २००९ मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे.

अमेरिकेतील अनेक दिग्गज व्यक्तींची ट्विटर अकाउंट जुलैमध्ये हॅक झाली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत आणि गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचा समावेश होता. आयफोनचा निर्माता Apple ही हॅकर्सच्या ताब्यात आला होता. त्यावेळीसुद्धा, हॅकर्सनी बिटकॉइन चलन मागितलं होते.



हेही वाचा

“उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री”

कमी कोरोना चाचण्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा