Advertisement

“उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री”

कोरोना विषाणूचं संकट राज्यात सुरू झाल्यापासून सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत, अशा तिखट शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री”
SHARES

कोरोना विषाणूचं संकट राज्यात सुरू झाल्यापासून सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकलेला नाही, अशा तिखट शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. (bjp leader pravin darekar slams cm uddhav thackeray over coronavirus outbreak in maharashtra)

राज्यात कोरोना महामारीचं संकट असताना आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्णालयांत दयनीय अवस्था आहे. पुण्यातील पत्रकार पाडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मग काय झालं तुमच्या आरोग्य यंत्रणेचं? मुख्यमंत्री पुण्याला गेले, कोविड सेंटर सुरू केलं. मोठमोठ्या घोषणा करून आलात. पण साधी एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पत्रकाराला नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर चौकशी करून काय उपयोग? मातोश्रीत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर जनतेचा आक्रोश पोहोचतच नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले. 

हेही वाचा- श्रीमंत लोकं दबाव टाकून आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे

या सरकारच्या कारभारामुळे राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा आला आहे. एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही ठिकाणी जाऊन आले. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे बरोबर नाही. राज्यभर फिरणं तर सोडाच मुख्यमंत्री मंत्रालयातसुद्धा यायला तयार नाहीत. मागे कोविड संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला. 

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातलं. पूर्ण कोकण उध्दवस्त झालं. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेलं, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना तिथं जायला वेळ मिळालेला नाही. सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना घरात बसून राज्य कारभार करता येत नाही. जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा उद्रेक झाल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली.

हेही वाचा- मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयाने आकारलं २१ लाखांचं बिल, गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा