'हे फक्त माझ्या शिवसैनिकांचं यश'

 Pali Hill
'हे फक्त माझ्या शिवसैनिकांचं यश'
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - कोणतीही जाहीर सभा न घेता यश मिळाले ते फक्त आणि फक्त शिवसैनिकांनी दिवस रात्र एक करून केलेल्या कष्टामुळे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. तसेच शिवसेनेने जी काही युती केली ती फक्त आणि फक्त भाजपासोबत, इतर कोणत्याही दुसऱ्या पक्षासोबत युती केली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. नाशिक,पुणे,उस्मानाबाद,विदर्भमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

Loading Comments